सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर – दि 23 मे रोजी नरसिह जयंतीचे औचिक्य साधून चंद्रपुरातील नावलौकिक पडगीलवार परिवाराणी स्थानिक दत्त मंदिर येथे मोठ्या उत्साहात नरसिह जयंती साजरी केली,यात नर्सिहचा जन्म,भजन कीर्तन अश्या अनेक सुप्त कार्यक्रमांनी भाविक मंत्र मुग्ध होऊन गेले होते.
दि,23 मे रोजी सकाळी नरसिह यांची विधिवत पूजा करून प्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, आप्त नातेवाईक,मित्र परिवार स्नेही असेअंदाजे 400 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला,
प्रल्हाद, प्रभा उमेश राव व प्रणिता, दिलखूष मनाचा राजा व मित्र परिवाराचा चाहता नीरज व सौ वर्षा पडगीलवार यांचे मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते,आलेल्या प्रत्येक भविकाशी स्वागत व स्नेह पूर्वक बोलणे,त्यांना मान सन्मान देणे हे या परिवाराचे मुख्य लक्ष असते,प्रसाद म्हणून प्रत्येक भाविकांना काला देण्यात आला यात सौ किरण व कु रिद्धी अभय राव केशट्टीवार यांनी मोलाचे सहकार्य केले, अत्यन्त आनंदी ,उत्साही, व खेळी मेळीच्या वातावरणात ही जयंती पार पडली असे भक्त श्री विवेक पोतनूरवार यांनी कळविले आहे.

