कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सावली तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचा कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व जेष्ठ कॉंग्रेस पदाधिकारी मा.मनोहर ठाकरे यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.विहिरगाव येथील स्व.नरेश पांडुरंग भोयर वय २३ वर्षे हा तरुण तेलंगना राज्यात काम करण्या करिता गेला असता अपघातात नरेश भोयर यांचे दुःखद निधन झाले,त्यांचे वडील भूमिहीन शेतमजूर, बारमाही मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे, घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने स्व.नरेश भोयर हे कुटुंबाला आधार व्हावा या उद्धेशाने काम करण्यासाठी गेले असता त्यांचे अपघातात निधन झाले, सदर घटनेमुळे विहिरगावात सर्वत्र शोककळा पसरली. घरातील कर्ता तरुण मुलगा गेल्याने भोयर कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.खुशाल लोडे,मा.दिलीप फुलबांधे, मा.कुसमाकर वाकडे, मा.काशिनाथ मोटघरे,मा.अनिल भरडकर,मा.अंबादास वाकडे, मा.हिवराज गायकवाड आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

