करडखेल येथे खरीपपुर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन…

0
52

बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर.

सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की उद्या दिनांक 30/5/24 रोजी आपल्या गावात संध्याकाळी ठीक 7 वाजता मारुती‌ मंदिरामागे करडखेल येथे “फार्मरिच प्रोड्युसर कंपनी (अग्रो माॅल)”व
“महाधन कंपनी”तर्फे खरीप हंगामा मधील मुख्य पीक सोयाबीन पीकांचे बिजोत्पादन,नवनविन जातीची लागवड व खत व्यवस्थापन बाबतीत प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सोयाबीन पिकासाठी योग्य खतवापर व अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचे बिजोत्पादन कसे करावे या संदर्भात फार्मरिच चे चेअरमन मा.रमेश चिल्ले (निवृत्त कृषी अधिकारी) व महाधन मार्केटिंग मॅनेजर साईनाथ सखाराम मोरे व महाधन मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर सौरभ पोपट माने यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून सरपंच सौ.पार्वती मुसने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील शेतकरी नागनाथ पांचाळ व प्रभुअप्पा राघु,पोलीस पाटील एकनाथ कसबे हे असतील .
तरी आपण सर्व ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे
ही नम्र विनंती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here