अहमदनगर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
आज राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने अहिल्यादेवी नगर (अहमदनगर जिल्हा) श्री शिर्डी या ठिकाणी खंडोबा मंदिर चौक पाण्याची टाकी परिसर दिनांक 31 मे 2024 दुपारी एक वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अभिवादन व पूजन करून उत्सव साजरा करण्यात आले. इस्लामी जिहाद्यांनी उध्वस्त केलेल्या सोमनाथ पासून ते काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत उत्तरेत श्रीनगर पासून ते दक्षिणेत रामेश्वर पर्यंत हिंदूंची अस्मिता असणाऱ्या भारत भरातील शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदूंचे धार्मिक पुनरुत्थान करणाऱ्या भारतीय इतिहासातील उत्तम प्रशासक पुण्यश्लोक राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! अभिवादन कसे करावे एक कुटुंब एक वृक्ष एक झाड एक परिवार लागवड व संगोपन रोप करा पुढच्या जयंती पर्यंत त्या बेलाचे झाड कडुलिंबाचे आंब्याचे सीताफळाचे रामफळ वड उंबर अशा अनेक झाडांचे झाडाची सेवा करा संगोपन करून हीच खरी जयंतीचा आदर्श होय असे प्रतिपादन राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वृक्ष मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी आव्हान केले याप्रसंगी शिर्डी येथील प्रतिष्ठित समाजसेवक अभय भैय्या शेळके भागवत आवटे देशमुख साहेब आकाश घोरपडे युवराज जाधव बहुसंख्य समाज बांधव मित्रपरिवार व शिर्डी शाखा लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ महाराष्ट्र तसेच जय मल्हार अहिल्यादेवी होळकर माता की जय घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

