यावल येथे आदिवासी विकास विभागातील विविध पदावरील १३ कर्मचाऱ्याचा सेवापुर्ती वर निरोप कार्यक्रम संपन्न

0
127

यावल प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध पदांवर आदिवासी आश्रमशाळा मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच, आदिवासी एकता मंच,संघटना आणी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या वतीने आयोजीत सेवापुर्ती सोहळ्याचा कार्यक्रम येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला . यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या सेवापुर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी एकता मंच,या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच चे प्रकल्प अध्यक्ष दस्तगीर तडवी. उपाध्यक्ष.विजयानंद सुरवाडे, न्याजोद्दीन तडवी खजिनदार निलेश तडवी महिला प्रकल्प अध्यक्ष मोनिका खरात जाधव महिला अध्यक्ष. एचडी पाटील विशनापुर मोहन तायडे मोहन तायडे गंगापुरी रायभान प्लासखेडा वानखेडे सर डोंगर कठोरा. माळी वैजापूर नवल राठोड. हेमराज चौधरी. नरेश बाविस्कर. बटर बारेला. सुखदेव बाविस्कर. संदीप पावरा पाटील, उल्हास पाटील. राजू तडवी. अनिल पगारे. शेख दादा. सचिन राठोड. भूषण सैंदाणे, मनीष तडवी सर अध्यक्ष लालमाती. खंबायत, विशाल गजरे, सुहास देवराज. संजय खडके. राजू तडवी. गडे. आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे हे होते . या सेवा निवृत्तीपर आयोजीत सेवापुर्ती निरोप सोहळ्यात आदिवासी विभागा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध आश्रम शाळांमध्ये कार्यरत असलेले यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे शिपाई अरुणगीर संतोषगीर गोसावी, दगुबाई दिलावर तडवी,अरूण शंकर महाजन , शकुंतला अनंतराव विसपुते, विमलबाई भिला पारधी, इंदुबाई दगडू पाटील,रत्नाबाई वामन देवरे,छगन रूपलाल सोनवणे,सुकदेव दिपचंद ठाकूर,संजय नथ्थु भालेराव, हमिदाबाई कूर्बान तडवी,रघुनाथ गणपत कापसे,ईमाम पहाडा तडवी अशा १३ कर्मचाऱ्यांना या कर्तव्यपूर्ती सोहळ्यात निरोप देण्यात आले. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी अरूण पवार,आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी व आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .
या कर्तव्यपुर्ती सोहळा कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनिष तडवी यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डोंगर कठोरा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस एन वानखेडे संदीप पाटील चोपडा. रत्नाकर वामन देवरे.व पळासखेडा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुर्यभान तायडे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार एस एन वानखेडे यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here