prabodhini news logo
Home चंद्रपूर पेंढरी (कोकेवाडा) जिल्हा प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रतिभा वाडगुरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

पेंढरी (कोकेवाडा) जिल्हा प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रतिभा वाडगुरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
248

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी (कोकेवाडा) जिल्हा प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रतिभा गोकुळदास वाडगुरे यांच्या सेवानिवृत्तीपर निरोप समारंभाचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात त्यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तारा राऊत , प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच निशांत शिंदे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी सभापती प. स . सिंदेवाही अरविंद राऊत , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास लेनगुरे , शाळा व्य. स . सदस्य जयप्रकाश मांदळे , ईश्वर सोनुले , सोनिया खोब्रागडे , एकनाथ चौधरी, विकास चौधरी, मुख्याध्यापक गोकुलदास लाकडे, देविदास मडावी , शाळेचे शिक्षक नालंदा खोब्रागडे आदी उपस्थित होते.
प्रतिभाताई वाडगुरे यांनी ३१ वर्षाच्या सेवेमध्ये शैक्षणिक कार्य सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करून पुढील शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून अनेक विद्यार्थ्यांना मदत केली आणि या कार्यामध्ये त्यांचे प्रेरणास्थान त्यांचे पती गोकुळदास वाडगुरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भारत विद्यालय हे आहेत . असे मत प्रमुख वक्ते म्हणून माननीय अरविंद राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले . त्यांच्याकडून वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, विद्यार्थ्यांना शिकवण्याची हातोटी हे गुण इतर शिक्षकांनी आपल्या अंगी बाळगावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उपसरपंच निशांत शिंदे यांनी व्यक्त केले . त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्यामुळे त्यांना पुढील वाटचाीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या ज्येष्ठ सहाय्यक शिक्षिका खोब्रागडे यांनी केले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here