कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती सोहळा सिंदेवाही नगरातील कुरमार धनगर समाज तर्फे मोठ्या थाटामाटात नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील संपूर्ण महिला युवक, युवती व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनी आपापले कला कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी धनगरी वेशभूषा परिधान केलेल्या महिला व पुरुष यांच्या सहकार्याने बाजार चौक ते सिद्धार्थ चौक, मदनापूर, राम मंदिर अशा प्रमुख मार्गाने येळकोट येळकोट जय मल्हार चा उद्गोष करीत फेरी काढण्यात आली. फेरीचा समारोप अहिल्यादेवी होळकर चौकात करण्यात आला. समाज बांधवांमध्ये उत्साह दिसून येत होता. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष आकाश नस्कुलवार, उपाध्यक्ष सुनील गोटेवार, लालाजी मंडलवार, मुखरू ताटलवार, संजय गोटेवार, दीपक बालूगवार, अक्षय जन्नेवार, गणेश रामवार, विलास येगेवार, राकेश येगेवार, आशु राचेवार, सोमेश राचेवार, संतोष मंडलवार, प्रकाश नस्कुलवार, सचिन नस्कुलवार, विनायक देवेवार, सोमेश येगेवार, मुन्ना गोटेवार, रामेश्वर कंकिरवार, गजानन नवले, विलास धुळेवार यांनी परिश्रम घेतले.

