
अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
अमरावती- आज दि. १-६-२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स शाखा अमरावती चे वतीने आयोजित बुद्ध महोत्सवानिमित्त वक्ते आयु रमेश जीवने हे धर्मनिरपेक्षता व बुद्धमय भारताच्या धम्मक्रांतीचे विज्ञान या विषयावर ते बोलत होते. सदर विषयावर त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संविधानात धर्माला महत्व नाही. आणि अनुसूचित जाती मध्ये ज्या ५९ जाती आहेत त्या सर्व हिंदू धर्मातील आहे अपवाद वगळता आपण १९५६ ला बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध झालो. तरी पण आपल्यातील काही हिंदू महार लिहितांना दिसतात. करीता आपली देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत १६ टक्के बौद्ध वेगळे म्हणून गणल्या जात नाही. त्यामुळे आपली अनुसूचित जाती मध्ये १३ टक्केच आपल्याला आरक्षण मिळते आहे. करीता त्यांनी आपली बुद्धिष्ट म्हणून वेगळी जनगणना करण्यासाठी समाजाने एकत्रित येऊन आंदोलन करावे. असे अनेक समाजाच्या हिताकरीता त्यांनी अमोल असे मार्गदर्शन केले. व आपण बहुजन नसून बौद्धजन आहो याचा देखील त्यांनी आवर्जुन उल्लेख केला आहे. तेव्हा समाजाने याचा गांभीर्याने विचार करावा.














