prabodhini news logo
Home चंद्रपूर नवरगाव ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

नवरगाव ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

0
188

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

नवरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवरगावचे सरपंच राहुल बोडणे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी दिवाकर येरमलवार, ग्रामपंचायत सदस्स पंकज उईके, श्रीकांत हेडाऊ, सुरेश गिरडकर, पवन जैस्वाल, भोला ईदुलवार, ज्ञानेश्वर कंकलवार होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचा मानसन्मान व्हावा या उद्देशाने सत्कार सोहळाचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. यावेळी ज्ञानेश महाविद्यालय, बालाजी महाविद्यालय, भारत विद्यालय, लोकसेवा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच मातोश्री विद्यालय येथील शाळा मधून प्रथम तीन येणारे विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका घेणारे मुख्याध्यापक यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर सरपंच राहुल बोडणे, मुख्याध्यापक वैद्य मॅडम, वनिता गभने मॅडम, संजय मरसकोल्हे सर तसेच ग्रा. पं. सदस्स पंकज उईके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. एकूण 20 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा यावेळी ग्रामपंचायत कार्यालय नवरगाव येथे पार पडला.

कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर कंकलवार व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी दिवाकर येरमलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here