prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही-लोनवाही शहरामध्ये विजय किरण फाउंडेशन तर्फे टँकर ने पाणी पुरवठा व संपूर्ण...

सिंदेवाही-लोनवाही शहरामध्ये विजय किरण फाउंडेशन तर्फे टँकर ने पाणी पुरवठा व संपूर्ण प्रभाग स्वच्छता अभियान सुरु

0
223

मा. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही शहरात काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई काही भागात निर्माण झालेली होती, जनतेला नळाद्वारे एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, परंतु ते पाणी अल्प प्रमाणात मिळत असल्याने पाण्याची तीव्र टंचाई शहरात जाणवत होती, काही दिवासापासून होत असलेल्या पाणी टंचाईची ही बाब सिंदेवाही शहर कॉंग्रेस अध्यक्ष सुनीलभाऊ उट्टलवार यांच्या निदर्शनास शहरातील संपूर्ण नगरसेवक नगरसेवीकांनी हि अडचण लक्षात आणून दिली असता त्यांनी लगेच क्षेत्राचे आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेता म.रा यांच्याकडे हा विषय मांडून त्यांच्याशी संपूर्ण नगरसेवक-नगसेविका यांच्या समक्ष चर्चा केली यावर तात्काळ दखल घेऊन सिंदेवाही शहरामध्ये विजयकीरण फाउंडेशन च्या माध्यमातून सिंदेवाहीकरांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याचे सूचना केल्या, मागील १५ ते २० दिवसापासून टॅंकर द्वारे सतत पाणी पुरवठा सुरू आहे.
तसेच नगर पंचायत ला मिळणारा 15व्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार ने मागील काही महिन्यापासून अडवून ठेवल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली असून या अडचीनीची सुद्धा दखल घेता क्षेत्राचे आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शहरातील संपूर्ण प्रभाग पावसाळ्या अगोदर नाली साफ-सफाई तसेच संपूर्ण प्रभागाची स्वच्छता व्हावी याकरिता देखील लागणारी निधी विजयकीरण फाउंडेशन* तर्फे दिला असून दोन्ही कामे शहरात योग्य नियोजनाने सुरु आहे. प्रत्येक प्रभागात पाण्याची टँकर पोहचविणे ही त्या प्रभागाच्या नगरसेवक-नगरसेविका यांची जबाबदारी राहणार आहे हे विशेष याची संपूर्ण जबाबदारी नगरपंचायत येथील नगराध्यक्ष,उपाध्यक्ष संपूर्ण सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांच्या देखरेखीखाली उत्तम प्रकारे कार्य सुरू असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.

सिंदेवाही शहरात पाण्याची टंचाई विचारात घेऊन क्षेत्राचे आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता म.रा यांच्या पुढाकाराने शहरात एकूण ६८ कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना* मंजूर करून जनतेची पाण्याच्या टंचाईची समस्या सुटनार आहे, हि पाणीपुरवठा योजना आसोला मेंढा पासून सिंदेवाही पर्यंत येत आहे हे काम निवेदा प्रक्रियेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here