prabodhini news logo
Home ठळक बातम्या उमरखेडच्या नेहाची ‘नीट’ मध्ये गगनभरारी ७२० पैकी ७२० गुण घेत देशातून प्रथम

उमरखेडच्या नेहाची ‘नीट’ मध्ये गगनभरारी ७२० पैकी ७२० गुण घेत देशातून प्रथम

0
201

यवतमाळ प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नुकताच नीटचा निकाल लागला असून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नेहा कुलदीप माने ही ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम आल्याचा मान तिने मिळविला आहे.

तालुक्यातील बोरी चातारी येथील शिक्षक असलेले कुलदीप माने यांची नेहा ही मुलगी असून उमरखेड ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त लघु पाटबंधारे विभागाचे एसडीओ रामराव माने पाटील यांची नात आहे. नेहा माने हिने देश पातळीवरील वैद्यकीय प्रवेशासंबंधीची परीक्षा नीट परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवून उमरखेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक मोठे उत्तुंग यश मिळवले.

नेहाची एम्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे. नेहा वर्ग पहिली ते आठवी श्री गुरुदेव गोरोबा विद्यालय, उमरखेड येथे, वर्ग नववी ते दहावी महात्मा फुले विद्यालय नांदेड येथे व पुढील अकरावी व बारावी गोदावरी कनिष्ठ महाविद्यालय, नांदेड येथे शिकली. नांदेड येथेच तिने नीटचे वर्ग लावले होते.

तिला दहावीत ९७ टक्के तर बारावीमध्ये ८१ टक्के गुण होते. पहिल्याच प्रयत्नात तिने या परीक्षेत हे यश संपादन केले. तिने तिच्या यशाचे श्रेय आजोबा रामराव माने, आजी, आई, वडील व छोटी बहीण निधी हिला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here