दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर
बल्लारपूर- बल्लारपूर शहरातील झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष तथा युवा पत्रकार रोहन कळसकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक श्रेत्रा मध्ये अतिशय प्रमाणिक पणाने योग्य देत आहे. तसेच रोहन कळसकर यांनी झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर ची स्थापना केल्या पासून ते नेहमी आपल्या परिसरात विविध प्रकारच्या सामाजीक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना मानवाधिकार साहयता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनु सिंग भारत यांनी त्यांच्या वर सलग तीन वेळा बल्लारपूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असून त्यांनी ती जबाबदारी यशस्वी पणाने व प्रामाणिक पणाने पार पडली आहे. त्याच सोबत यांना सामाजीक क्षेत्रा सोबत पत्रकार श्रेत्रात काम करण्याचा शोक असलेल्या ने त्यांनी विविध दैनिक पेपर व वेबसाइट पोर्टल मध्ये तालुका प्रतिनिधी पासून तर विदर्भ प्रतिनिधी म्हणून काम केले आहे . हे सर्व काही करत असताना त्यांनी दिंनाक 14 एप्रिल 2023 ला आपल्या स्वतःच्या मालकी चे क्रांतिसुर्य न्युज वेबसाइट चे ऑपनींग केले. त्या वेबसाइट च्या माध्यमातून अनेक वेळा शिक्षण क्षेत्रातील व सामाजीक क्षेत्रातील नागरिकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले आहे. ह्या सर्व गोष्टी माहिती शिवतेज संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष प्रशांत रामटेके यांना मिळताच त्यांनी लगेच शिवतेज संघटनेचे राष्ट्रीय हबरुन शेख यांना माहिती दिली. व त्यांनी कुठल्याही प्रकारचा क्षणाचा विलंब न करता त्यांनी लगेच बल्लारपूर शहरातील युवा पत्रकार तथा झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर यांची शिवतेज संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

