
यवतमाळ प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
मर्दानीखेळ असो. यवतमाळ तर्फे क्लास वरील वर्ग 10 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम, काल मर्दानी खेळाच्या क्लास यवतमाळ येथे घेण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणीलक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रमूख अतिथी म्हणून कुळसंगे, हामंद, सातारकर, dr बत्तलवार, व कीर्ती राउत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पालक वर्गातून आंबलेकर, देवानंद पोहोकार, भाकरे आणि रॉय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर शुभेच्छा दिल्या, गुणवंत विद्यार्थ्यां मद्ये सुकन्या पोहोकर, अनुश्री बोरगावकर, सिध्दी मेहता, सौंदर्या भड ,ईश्वरी गोडबोले, देवयानी भाकरे, ज्वाला कुळसंगे, प्रद्युम्न देशकर, वांशिका गुप्ता, नेहारीका गुप्ता, रिद्धी चांदेकर आणि अवनी या सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचा सामाजिक संदेश देत एक छोटस रोपट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन मर्दानी खेळाचे मुख्य प्रशिक्षक प्रितम सोनवणे यांनी केले.














