प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
भद्रावती- दि. 05/06/2024 रोजी चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार माननीय प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांचा दणदणीत विजया निमित्त विजय मिरवणुकीचे आयोजन वरोरा व भद्रावती इथे करण्यात आले.
4 जून रोजी मतमोजणी झाली. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर याची जोरदार लढत होती. परंतु 2.50 लाख इतक्या भारी मताधिक्याने प्रतिभा धानोरकर हे दणदणीत विजय होईल असे कोणालाच वाटले नाही. त्यांच्या विजय रॅलीमध्ये वरोरा येथे आम आदमी पार्टी वरोरा – भद्रावती विधानसभा तर्फे त्यांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले व समोरच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल राम, वरोरा तालुकाध्यक्ष गौरव मेले, अमोल पिंपलशेंडे, प्रेम दुधलकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

