धामणगाव ग्राम काॅंग्रेस कमेटीची आढावा बैठक संपन्न

0
53

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपूरी तालुक्यातील धामणगाव येथे ग्राम काॅंग्रेस कमेटी व काॅंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राजेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान उपस्थित नागरिकांनी गावातील विविध समस्यांचा पाढा वाचला. या समस्यांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांना माहिती दिल्या जाईल. व समस्या सोडविल्या जातील. त्यासाठी २३ जुन रोजी स्वतः विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धामणगाव या गावाला भेट देणार असल्याचे देखील यावेळी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी उपस्थितांना सांगितले. सोबतच नागरिकांना शासकीय व इतर कामात मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले विजयदुत सौरभ नंदेश्वर यांची सर्वांना ओळख करून देत कामाच्या रुपरेषेबद्दल माहिती देण्यात आली.

यावेळी पुंडलिक भर्रे, पुरूषोत्तम बोरकर, जगदीश पुराम, सुकरू कार, राजेंद्र बगमारे, मंगेश भर्रे, रवी आठवले, पराग पारधी, विशाल भुरके, रविंद्र राऊत, बंडु मडावी यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here