ब्रम्हपूरी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हुसेन जिवानी यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

0
109

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपूरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक मोहम्मद हुसेन जिवानी यांनी नुकताच काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे सुरू असुन ब्रम्हपुरीची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू आहे. येत्या काळात विकसित शहर म्हणून ब्रम्हपूरी पुढे येणार आहे. हे सर्व राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नामुळे होत आहे.
त्यामुळे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केलेल्या विकासकामांवर व त्यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी
येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हुसेन जिवानी यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सोबतच नागपूर हायकोर्टात कार्यरत अॅड कबीर कालिदास व अॅड. प्रियंका बांबोळे यांनी देखील यावेळी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, न.प. माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डि.के. मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे सतीश डांगे, अॅड. आशिष गोंडाणे, प्रा. चंद्रशेखर गणवीर यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here