prabodhini news logo
Home कारंजा नेर येथे सुरक्षा रक्षक सुपरवायझर पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण

नेर येथे सुरक्षा रक्षक सुपरवायझर पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण

0
129

उषा नाईक
जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज, वाशीम

भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नई दिल्ली एस आय एस इंडिया लिमिटेड व स्त्री शक्ती मंच संघटना कारंजा लाड संयुक्त विद्यमाने आयोजित नेर येथे सुरक्षा रक्षक, सुपरवायझर पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली.
स्त्री शक्ती मंच संघटनेच्या राज्य अध्यक्षा शारदा अतुल भुयार राष्ट्रीय उद्योग इंडिया विदर्भ सचिव,एस आय एस अधिकारी नागेश भोजने सर यांनी मुलांची फिटनेस चाचणी घेतली सिलेक्ट झाले त्या मुलांना पुणे येथे ट्रेनिंग साठी एक महिना करिता पाठवण्यात आले ट्रेनिंग होताच त्यांना गावाचं नाव देण्यात येईल आणि त्यांचा जॉब नौकरी सुरू होईल.
स्त्री शक्ती मंच संघटनेच्या शारदा अतुल भुयार यांनी मेळाव्यातचे आयोजन केले महाराष्ट्र राज्य प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यांत एक हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
नेर येथे शिवाजी महाराज क्रीडा संकुल नेर येथे सुरक्षा रक्षक सुपरवायझर पदासाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्या साठी नेर येथील सौ रेणुका जैस्वाल, लता काळे यांनी मोलाचे सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here