वाशीम प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
भारतीय सुरक्षा परिषद नई दिल्ली व एस आय एस इंडिया लिमिटेड व स्त्री शक्ति मंच संघटना कारंजा लाड संयुक्त विद्यामाने सुरक्षा रक्षक व सुपरवायझर पदासाठी दिनांक 22 व 23 दोन दिवस भरती प्रक्रिया चालणार आहे.निवड झाले त्या मुलांना पुणे येथे एक महिन्याचे ट्रेनिंग देण्यात येईल आणि लगेच गावानुसार त्यांना नोकरीच्या ठिकाणी पाठवले जाईल. क्रीडा संकुल बायपास कारंजा लाड येथे भरती अधिकारी नागेश भोजने यांच्या उपस्थितीत. क्रीडा संकुल बायपास कारंजा लाड येथे आज दिनांक 21 ला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आयोजक स्त्री शक्ती मंच संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षा शारदा भुयार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. स्त्री शक्ती मंच संघटनेच्या कार्यकर्त्यां एकता गायकवाड, कामक्षा सोने, सविता फुके, सोणाली येळणे, कृपा ठाकरे, भोरेताई, शारदा भुयार, मंगला नांगरे, यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
आज शिवाजी गायकवाड यांच्या सहकार्याने वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. रवि गजभिये, नागेश भोजने उपस्थित होते.

