
राजर्षी शाहू महाराजांना जयंती निमित्य काँग्रेसतर्फे अभिवादन
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
आज जयंती निमित्ताने सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क व तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय सावली येथे राजर्षी शाहू महाराजांना पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पाणी पुरवठा आरोग्य व स्वच्छता सभापती मा.प्रितम गेडाम,नगरसेविका सौ.ज्योती गेडाम,सौ.पल्लवी ताटकोंडावार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.मुकेश गुरनुले,मा.कुणाल मालवनकर पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांनी आपल्या राज्यकाळात आरक्षणाची सुरवात करून सामाजिक क्रांतीची बीजे पेरली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात,शाहू महाराज यांची जयंती संपूर्ण देशात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.














