सिंदेवाही ठाणेदार व तहसिलदार मार्फत निवेदन; व्हॉईस ऑफ मिडीया तालुका सिंदेवाहीच्या वतीने जाहीर निषेध.
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हातील मुल येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार यांनी भ्रमणध्वनीव्दारे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संजय पडोळे यांनी पोलीसांत तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे . पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकाश मारकवार यांचेवर कठोर कारवाईची मागणी करीत व्हाईस ऑफ मिडीया सिंदेवाही तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध नोंदविला आहे . प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना दिलेली धमकी ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असुन पत्रकार आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावुन घेणारी असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर नेत्याकडुन झालेल्या बेकायदेशीर कृत्याचे आम्ही व्हॉईस ऑफ मिडीया सिंदेवाही तालुक्यातील सर्व पत्रकार जाहीर निषेध नोंदवित आहोत. सोबतच काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांचेवर फौजदारी गुन्हयाची नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण व सिंदेवाहीचे तहसिलदार पानमंद यांच्या मार्फतीने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे . त्यावेळी सिंदेवाही तालुका पत्रकार अमर बुद्धारपवार , दयाराम फटींग , सुनिल घाटे , दिलीप मेश्राम , शशिकांत बतकमवार , वहाबअली सय्यद , प्रशांत गेडाम आदी उपस्थित होते .

