सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
चंद्रपूर
आर्य क्षत्रिय शिंपी तेलगू समाज चंद्रपूर च्या नवीन कार्यकारिणी करण्यात आली त्याचे अध्यक्ष श्री यशवंत (बाबा) भूषणवार उपाध्यक्ष अरविंद माहूरपवार सचिव सौ.शुभांगी किशोर डोंगरवार सहसचिव श्री अशोक डोंगरवार सौ.शुभांगी अरविंद माहूरपवार इतर पदाधिकारी यांनी दिनांक १/७/२४ रोज सोमवारला डॉक्टर डे चे औचित्य साधून आपल्या समाजातील गुणवंत महिला ज्यांचे समाजात खूप मोठे कार्य आहे अशा नामवंत डॉक्टर शिमला गार्जलवार यांची प्रत्यक्षात भेट घेऊन डॉक्टर डे च्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या समाजातर्फे प्रथमच त्यांना डॉक्टर दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला.
आर्य क्षत्रिय शिंपी तेलगू समाज जिल्हा चंद्रपूर च्या वतीने असेच नवनवीन उपक्रम राबवित आहे. आणि समाजातील रंजल्या गांजल्यांना समोर आणण्यासाठी संधी प्राप्त करून देईल अशी समितीने जिज्ञासा बाळगली आहे.

