आई ती आई असते!
दुधावरची साय असते
आपल्या लेकराला पोटाशी
धरणारी ती माय असते
आई एक आठवण असते !!
मैत्रीची साठवण असते
आई ती फक्त आई असते
घरात असली की घर कसे ।
भरभरून दिसते
आई खरी तर मैत्रीनच असते
आपल्याला ठेच लागली की !
दुःख मात्र आई ला होते
आई ती फक्त आई असते
आपल्या आई इतक आपल्यासाठी!
कुर्णीच झटत नाही
स्वतःला इझिजवून आपल्या लेकराच
आयुष्य मात्र उजळ वते
ती म्हणजे फक्त आई असते
शरीर थकल तरी ती कधीच थकत नाही !!
आपल्या आई इतक प्रेम
आपल्या वर कुणीच कसू शकत नाही
आई ती फक्त आई असते
आई तुझे कौतुक करताना ।
माझ्याकडे शब्दच उरत नाही
आई ती फक्त आई असते
सागराचे पार्णी कधी आटणार नाही !!
आई हा जन्म काय हजार जन्म जरी घेतले ना
तरी तुझे उपकार कधी फीटनार नाही
आई ती फक्त आई असते
कवियत्री – पूजा गौतम वाहूळे
जालना

