
दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर
चंद्रपुर :- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण भाई तांडेल यांनी जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देवून, रक्तदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेचे उद्दीष्ट नजरे समोर ठेवून पदाधिकाऱ्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान व नेत्रदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांना दिलेल्या सुचनेनुसार वाहतुक जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष जिल्हाप्रमुख अरविंदजी धिमान यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ०१ जुलै २०२४ ला पंजाबी समाज सेवा समिती, विवेक नगर, मुल रोड, चंद्रपूर येथे रक्तदान व नेत्रदान आणि आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर शिबिरामध्ये 11 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 11 दात्यांनी स्वखुशीने नेत्रदान सुद्धा केले. सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, वजन, शुगर, एचबी, सीबीसी, डब्ल्यू बीसी थायरॉईड, ईसीजी, हृदयरोग, स्त्रियांचे विकार आणि डोळ्यांची तपासणी करून मोफत औषधी व उपचाराचा लाभ असंख्य नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिरातून करुन घेतला.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे व चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोले यांनी रक्तदान व नेत्रदान आणि आरोग्य शिबीराला मोलाचे सहकार्य केले. तसेच तज्ञ डॉक्टरांची टिममध्ये डॉ. अभिजीत सावळकर, डॉ. भुषण चौखा, डॉ. ईश्वर मेश्राम, डॉ. अभय राठोड, रत्नधोप मेश्राम, डॉ. दिपांजली सावळकर, मिस प्रीती वर्मा, कु. निशा चांदेकर, योगेंद्र इंदोरेकर उपस्थित होती.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार, चंद्रपुर विभाग प्रमुख अजय यादव, वाहतुक तालुका अध्यक्ष सुरेश खापर्डे, महानगर अध्यक्ष निलेश गुजर, महानगर उपाध्यक्ष सुहास बटाले, आकाश खैरे, गुरुदास मेश्राम, विश्वास खैरे, मंगेश वांढरे, राजू रायपुरे, बॉबी विरधी, सूरज चवलढाल आदीनी परिश्रम घेतले.














