दिपाली पाटील
महिला जिल्हा उपसंपादक
प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर
चंद्रपूर :- भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असून त्याचे महत्व जनमाणसांपर्यत पोहोचविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्थेच्या वतीने रामनगर पोलीस ठाण्यात आज संविधान जागर उपक्रम राबविण्यात आला.
संविधान जागर उपक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था चंद्रपूर चे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, अभियंता शेषराव सहारे, रमेश दिवटे, सिद्धार्थ रणवीर, प्रभू कजलीवाले, राजेंद्र शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्था चंद्रपूर च्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार ठिकाणी संविधान जागर उपक्रम राबविण्याचा मानस असून आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात 158 वा संविधान जागर उपक्रम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या अध्यक्षतेत राबविण्यात आला.
सदर उपक्रमात अशोक घोटेकर यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना संविधान प्रास्ताविकेची प्रत वितरित करीत प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले तसेच संविधान जागर उपक्रमाचे महत्व विषद केले.
संविधानाची निर्मिती व संविधानाचे महत्व यावर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक इंजि शेषराव सहारे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले.
यावेळी रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

