कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिंदेवाही – दि. 5/7 नागपूर मधील दिक्षाभूमी ही तमाम भारतातील बौद्ध समाजाची अस्मिता असून, दिक्षाभूमी जवळ शासनाने पार्किंग च्या बाबत खोदकाम केले होते. या खोदकामामुळे दिक्षाभूमीच्या स्तुपाला समोर मोठा धोका निर्माण होऊ शकतो,ही बाब तमाम आंबेडकरी अनुयायांच्या लक्षात आल्यावर एकजूट होऊन दीक्षाभूमी नागपूर मध्ये एकत्र जमाव करून शासनाकडून होत असलेले काम बंद पाडले, या दरम्यान दिक्षाभूमी बचाव या आंदोलन दरम्यान पोलीस प्रशासन नी आंबेडकरी अनुयायावर गुन्हे दाखल केले होते,त्यामुळे भिम आर्मी संघटना शाखा सिंदेवाही यांनी तहसीलदार यांना भेटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले हे निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष अक्षय चहांदे, शहर अध्यक्ष तेजस वानखेडे, सचिव धनंजय साखरे,गोकुल रामटेके, प्रकाश मेश्राम अंबादास दुधे, सुनिल गेडाम, व इतर सभासद उपस्थित होते.

