सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष माननीय अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र सरचिटणीस मा. सुरेश मोहिते साहेब यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवर वंचित बहुजन रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर वंचित बहुजन माथाडी ट्रा.ज.का. यु. मुंबई सरचिटणीस सुनिल लोखंडे साहेब ,रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, रायगड जिल्हा निरीक्षक वेदांत जाधव साहेब ,यांच्या उपस्थितीमध्ये महाड येथे नागेश दादा देशमुख यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली तसेच दीपक गायकवाड यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदा वरती नेमणूक करण्यात आली तसेच व त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मध्ये प्रवेश केला.

