prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या त्वरित सोडवण्यात...

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या त्वरित सोडवण्यात यावे

0
163

अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषदेची मा. अधिष्ठाता गिरिश जतकर यांच्याकडे निवेदन

यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांना मृत्यूकडे ढकलले जात आहे. अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषदेचे असे मत असून या रुग्णालयातील समस्यांचे त्वरित समस्या सोडवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज दिनांक 15 /7 /2024 ला देण्यात आले.
यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आहे या रुग्णालयात जिल्हा सहित महाराष्ट्रातील अनेक विभागातून इलाजासाठी रुग्ण येत असतात असे असताना देखील या रुग्णालयात अनेक सुविधा अपुऱ्या पडत आहे त्यामुळे रुग्णांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास , अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे औषधांचा तुटवडा, वेळेवर न होणारा इलाज, रुग्णांकडे डॉक्टरकडून होणारे दुर्लक्ष, वार्डातील अस्वच्छता सिकलसेल रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा न होणे, फिल्टर पाण्याचा पुरवठा न होणे, महाविद्यालयातील ज्येष्ठ डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याने शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांना होणारा त्रास, गेल्या वर्षभरात सिटीस्कॅन मशीन धुळ खात असल्याने रुग्णांना सिटीस्कॅन बाहेरून करून घ्यावे लागत आहे, औषधांचा तुटवडा, अशा अनेक प्रकारच्या समस्या या रुग्णालयात असून याकडे रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रुग्णांना मृत्यूचा सामना करणे भाग पडत असल्याने अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषद ने आज दिनांक 15/7/2024 ला मा. अधिष्ठता गिरिश जतकर, यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे मनीषा तिरणकर, मोबीन शेख, अविनाश धनेवार, सविता भैसारे असे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here