विजेचा धक्का बसल्याने सापाचा मृत्यु

0
369

इंडस्ट्रियल भागात ३० फूट विद्युत खांबावर चढला ६ फुटाचा साप

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर- आदर्श पेट्रोल पंप मागे इंडस्ट्रियल कॉलनी मध्ये संतोष कंदीपूरवार यांना आज सकाळी विद्युत खांबावर एक भला मोठा साप आढळला ,त्या सापाला विजेचा धक्का बसल्याने ती मृत्युमुखी पडला असावी असे त्यांना वाटले ,पण तो साप हालचाल करतांना दिसला म्हणून त्यांनी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी च्या अमित देशमुख यांना फोन वरून माहिती दिली लगेच घटना स्थळी जाऊन बघतो तर धामण जातीचा साप असल्याचे निष्पन्न झाले , पण विद्युत खांबावर चढून सापाला पकडणे जोखीमीचे असल्याने त्यांनी महावितरण च्या सह्हायक अभियंता कुइटे यांना फोन वरून घटनेची माहिती देण्यात आली, त्यांनी घटनास्थळी MSEB चे कर्मचारी पाठवले घटनास्थळी पोहोचून ,मेन लाईन वरून डीपीची लाईन बंद करण्यात आली. कारण जर सापाने आणखी हालचाल केली असती तर आणखी इंडस्ट्रियल भागातली लाइट गेली असती व लाईन मॅन ला पण धोका झाला असता , त्याच्यानंतर लाईन मॅन वर चढून त्यांनी सापाला खांबावरून काढण्याचा प्रयत्न केले असता. त्या सापाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे लक्षात आले. धामण साप हा विजेच्या खांबावर पक्ष्याच्या घरट्यातील पिल्ले खाण्यासाठी वर चढला होता व त्यात त्याचा विजेच्या धक्क्यात दुर्दवी मृत्यू झाला असे अनेकदा शहरात घडते. पण ह्या सापाला वाचविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले .
घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी अमित देशमुख व दिनेश खाटे व महावितरण चे काटकर, राऊत, डेव्हिड घटनास्थळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here