मौलाना आझाद वार्डात बोरवेल ची सोय करा.-आम आदमी पार्टी, बल्लारपूर

0
79

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर – बल्लारपूर दि. 19/07/2024 शहरात अधूनमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ 4-5 दिवस येत नाहीत. अनेकदा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरातील मौलाना आझाद वार्ड मिलिंद चौक परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येचे गाऱ्हाणे आम आदमी पक्षापुढे मांडले. यानंतर आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आप शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेण्याची वेळ मागितली पण त्या वेळेत ते नगरपरिषदेत उपस्थित नव्हते त्यांच्या अनुपस्थितीत नगरपरिषद कर्मचारी संगीता उमरे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मौलाना आझाद वार्ड मिलिंद चौक परिसरात बोरवेल ची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रवि पुप्पलवार, मनिषा अकोले, ज्योती तोडेकर,प्रज्ञा पिपरे, ज्योती टोडेकर , वृंदा पिपरे, बबिता नगराळे, पौर्णिमा दुबे, सुनीता बंगले, दर्शना कुळसंगे ,अर्चना काळे, बुजाळे, दामिनी, सिंधु राधाबाई डोंगरे, शोभा मोरे, पौर्णिमा पाटील व इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here