सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, डॉ कृषीराज टकले पाटील मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मिळावे सगेसोयरे कायदा त्वरित लागू करुन सरकारने अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या घेऊन मराठा समाज आंदोलन करत आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटीलही याप्रश्नी आग्रही आहेत त्यामुळे मराठा समाजाला वेठीस न धरता आरक्षणाचा तिढा सरकारने त्वरित सोडवावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा असे मत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषीराज टकले पाटील यांनी व्यक्त केले
स्वाभिमानी मराठा महासंघाची बैठक नुकतीच पार पडली त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक डॉ कृषीराज टकले बोलत होते या बैठकीत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला या बैठकीस स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्षा अमृता ताई पठारे , दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्षा शिवशंभू प्रिया जांभळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव, अहिल्यादेवी नगर महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मनिषा निमसे, जिल्हा कार्याध्यक्षा महिला आघाडी डॉ राधा गमे, अहिल्यादेवी नगर जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, युवा आघाडी जिल्हा प्रवक्ते निखिल कराळे,राहुरी तालुका अध्यक्ष शरद खांदे आदि उपस्थित होते कार्यक्रम सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे यांनी केले
स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे बैठक प्रसंगी म्हणाल्या की, मराठा समाजाला आरक्षण मिळाविण्यासाठी महिलांनी एकत्र यावे.
मराठा समाजातील बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आरक्षण वरदान ठरणार आहे त्यामुळे आरक्षणावर त्वरित तोडगा काढा असे उदगार स्वाभिमानी मराठा महासंघाच्या दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्षा शिवशंभू प्रिया जांभळे यांनी काढले.

