– ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी सरसावला पाऊल.
– पाच वर्षा पासून देत आहेत अविरत आरोग्य सेवा.
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी nyuj- आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय संस्कृतीक शिक्षण मंडळ चंद्रपूर या संस्थेच्या ‘आदिवासी ग्रामीण आरोग्य अभियान’ अंतर्गत करंजी या गावातील डॉ किशोर पेंढारकर मागील अनेक वर्षा पासून ग्रामस्थांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा देत आहेत. येथील गरीब, गरजू व आदिवासी घटकांच्या मदतीसाठी अत्यंत अल्प दरात तर कधी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
आदिवासी लोकांच्या आरोग्याच्या काही सामान्य समस्या म्हणजे आहारातील आवश्यक घटकांची कमतरता जसे कुपोषण, मद्यपानाचा अतिरेक, व्यसनाधीनता, यासारख्या सामाजिक समस्यांमुळे आदिवासी आरोग्य आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
त्यामुळे डॉ किशोर पेंढारकर यांनी ग्रामीन भागात प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्याचे पाऊल पुढे टाकले आहे. डॉ पेंढारकर हे प्राथमिक आरोग्य सेवा बरोबरच व्यसनमुक्ती समुपदेशन, किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयक मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी निःस्वार्थ भावानेतून सुरु केलेल्या ‘आदिवासी ग्रामीण आरोग्य अभियान’ चे ग्रामस्थाकडून स्वागत होत आहे. ग्रामस्थानी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल पेंढारकर ह्यांनी केले आहे.
(In box)
वडील नोकरीला असल्यामुळे एटापल्ली सारख्या आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात माझं बालपण गेलं.
त्यामुळे तेथील आदिवासीचे ग्रामीण जीवन मला अनुभवता आले. लोकांची आरोग्य विषयक समस्या कळायला लागली तेव्हा पासून डॉक्टर बनून आरोग्य सेवा देण्याचे निश्चित केले होते.
करंजी येथे वडिलगावी येवून मी येथील गरीब,गरजू व आदिवासी घटकासाठी आरोग्य सेवा देत आहे, ह्याचे मिळणारे समाधान माझ्या कार्याची पोचपावती आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आदिवासी ग्रामीन साहित्य बहुद्देशीय संस्कृतीक शिक्षण मंडळ या संस्थेच्या वतीने सुरु केलेले ‘आदिवासी ग्रामीण आरोग्य अभियान’ अविरत सुरु ठेवेन. -डॉ किशोर पेंढारकर, करंजी

