
राहुल वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली – कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय, वासाळा (ठाणेगाव) येथे दिनांक २७ जुलै २०२४ ला राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने मा.सुनील मेश्राम प्राचार्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरणातील कमी होत असलेले जंगलाचे प्रमाण , झाडाचे महत्त्व, झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण विषयावर मार्गदर्शन केले. हेमंत मोहितकर यांनी मार्गदर्शन केले
सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला प्राचार्य सुनील मेश्राम,पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे, प्रा.नानाजी रामटेके, प्रा. मनोज आलबनकार, प्रा.विनोद कुनघाडकर ,जितेंद्र नरुले सर भास्कर उरकुडे, लालचंद शिखरामे, जयप्रकाश गजपुरे, मुकेश वालोदे सर तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि हरीत सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.














