prabodhini news logo
Home कविता कविता – रूप तुझे

कविता – रूप तुझे

0
672

वाटतं तुझ्या रूपावर
एक कविता करावी
निरागस चेहऱ्याचे भाव
निरखून जरा पहावी

ओघळणाऱ्या घामाच्या सरी
हळूच पुसून टाकावी
गालावर येणाऱ्या केसाला
अलगदच सावरावी

नयनांचे भाष्य तुझे
नयनांनी माझ्या वाचावी
ओठातून निघणारे शब्द तुझे
ओठांवर माझ्या सजावी

गालावरच्या खळीने तुझ्या
लाजळूही लाजावी
हसणं तुझं पाहून
सागरालाही भरती यावी

मोहक तुझ्या अदेने
फुले डूलु लागावी
छटा तुझ्या रंगाची पाहून
फुलपाखरालाही वेड लागावी

कोमल प्रीत सखे तुझी
हृदयी माझ्या असावी
चंचल अंतर्मनी माझ्या
तूच तूच दिसावी

स्नेहबंध तुझे माझे
आगळी वेगळी असावी
जीवनाच्या प्रत्येक पावलावर
फक्त साथ तुझीच असावी

कवियत्री – जयश्री चव्हाण/जयु
वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here