prabodhini news logo
Home अकोला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी

0
79

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज,- अकोला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्य लेखणील फकीरा हे कादंबरी अर्पण करणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट २०२४ रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक रेल्वे स्टेशन अकोला येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये आमचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जाते या कार्यक्रमांमध्ये आम्हाला बोलण्याची विनंती केली त्यानंतर मी भाषण देण्यासाठी सुरुवात केली माझ्या भाषणात मी सर्वप्रथम साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली.अनेक वर्षापासून आम्ही मांगत असलेला भारतरत्न हा पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांना मिळाला पाहिजे अशी आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीने माझ्या भाषणात मी मागणी केली.ज्यांनी या देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं सिंहाचा वाटा असणारे अण्णाभाऊ साठे यांनी देशासाठी महान कार्य केलं त्यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी घेतली पाहिजेत अशी आम्ही अपेक्षा करतो,रशिया सारख्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले, संयुक्त महाराष्ट्र चळवळ गतिमान करून या राज्याला वाचवण्याचे काम केलं अनेक देश हिताचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले त्याचा विसर पडू नये आमचा एकच उद्देश आहे की अण्णाभाऊ साठेंचं कार्य घरोघरी पोहोचण्याचा एक विचार माझ्या भाषणातून मी मांडला.या ठिकाणी मला बोलण्याची संधी आणि माझा सत्कार केला त्याबद्दल आयोजकाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.आणि सर्व देशवासीयांना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
सगळ्यांनी मोठ्या उत्सवात जयंती साजरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here