ब्रम्हपूरी शहरातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नोटबुक वितरीत
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – अविरत मानव सेवेकरिता सदैव तत्पर असलेले व सच्चा जनसेवक म्हणून सर्वदूर परिचित, राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून ब्रह्मपुरी शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नुकतेच नोटबुकचे वितरण करण्यात आले.
एकीकडे देशात साक्षरतेसाठी सर्व शिक्षा अभियानाचा सरकार डंका पिटत आहे. मात्र दुसरीकडे प्रचंड महागाई व बेरोजगारीमुळे अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शासनाने शालेय गणवेश, व मोफत पाठ्यपुस्तके योजना कार्यान्वित केली. परंतु बाजारपेठेत उपलब्ध असलेले नोटबुक यांची वाढलेली किंमत लक्षात घेता गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत. तर राजकारणात समवेतच विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक दायित्व जोपासणारे व सच्चा जनसेवक अशी ख्याती प्राप्त, राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ग्रामीण स्तरावरील गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता मदतीचा हात पुढे करीत सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुके उपलब्ध करून दिली. सदर नोटबुकांचे वितरण ब्रह्मपुरी शहरातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना काॅंग्रेस पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी काॅग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटू पिलारे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, योगेश मिसार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे, माजी नगरसेवक जगदीश आमले, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, महीला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुधा राऊत, रूपचंद बनसोड, अॅड आशिष गोंडाणे, रवी पवार, अतुल राऊत, मोहन निखाडे, सुनील विखार, प्रकाश खोब्रागडे लक्ष्मण जीभकाटे, चंद्रशेखर गणवीर, मोहन ब्राडिया यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

