इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे किलबिल अनाथ आश्रमातील मुलांना मदत

0
137

Prashant Ramteke Chief Editor Prabodhini News- क्लब अध्यक्ष सुचिता जेऊरकर आणि सचिव पल्लवी तेलंग यांच्या मार्गदर्शनाने 31 जुलाई ला किलबिल अनाथालयातील लहान मुलांना दूध पावडर, दूध बॉटल ,डिटर्जेंट फिनायल, डेटॉल ,लैजोल ,हार्पिक व स्वच्छ कपडे दान करण्यात आले. या उपक्रमामुळे अनाथालयातील मुलांच्या पोषण आणि स्वच्छतेची गरज पूर्ण करण्यात आली आहे.
दूध पावडर मुलांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांनी भरपूर आहे, ज्यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते.
नियमित दूध सेवनाने मुलांची हाडे मजबूत होतात आणि त्यांचे सर्वांगीण आरोग्य सुधारते.
बाळांच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य दान केल्याने त्यांची स्वच्छता राखणे सोपे होते, ज्यामुळे त्यांना संक्रमणांपासून वाचवता येते.

या उपक्रमासाठी कविता झाडे, उज्वला कांबळे, किरण आवळे, अंजली उत्तरवार, तृप्ती डाखरे, आणि स्नेहा कोंकमवार यांनी आर्थिक मदत केली इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक संदेश पसरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here