prabodhini news logo
Home चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमामध्ये शिबीराचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर तर्फे डेबू सावली वृद्धाश्रमामध्ये शिबीराचे आयोजन

0
143

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश मा. सुमित जोशी यांच्या प्रयत्नातून डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धाकरिता निराधार योजना, वयोश्री योजना, श्रावण बाळ योजना व अन्य शासकीय योजना चा लाभ मिळवून देण्याकरिता उपविभागीय कार्यालय चंद्रपूर तर्फे उपविभागीय अधिकारी मा संजय पवार यांचे मार्गदर्शनात डेबू सावली वृद्धाश्रमातच शिबीर आयोजित करून तिथेच सर्व प्रक्रिया पार करून दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात नायब तहसीलदार मा. गादेवार,तलाठी मा दुवावार, ऍड.महेंद्र असरेट समाजकल्याण व तहसील कार्यालयातील उराडे, रत्नपारखी, शामल, चिवंडे उपस्थित होते. वृद्धाश्रमाची माहिती तथा संचालन व आभार धनंजय तावाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here