चंद्रपुर जिल्हयातील जिवती,सावली 1024 कुटूांबाांना मिळणार घरकुल निधी
दिपाली पाटील उपसंपादक चंद्रपूर – दिनांक 30 जुलै 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना मागणी करण्यात आली होती . चंद्रपूर जिल्ह्य़ातील जिवती, सावली, तालुक्यातील
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी गोरगरीब कुटुंब आज सुद्धा पक्का घरापासून वंचित आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील आज सुध्दा कुटूंब पडत्या घरात आपला निवारा करत आहे. आणि हे बाब जिवती, सावली, मुल, चंद्रपूर, तालुक्यात पाहायला मिळतात. तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्य़ातील अशा कुटुंबातील गोरगरीब गरजु ची निवड करुन सदर लाभार्थीना शासकीय यंत्रणेत राहुन विहित नमुन्यात अर्ज भरुन सेवा सुविधा मिळविणे आर्थिक मदत पदरात पाडून घेणे त्यांना शक्य होत नाही आहे . म्हणून जिल्हाधिकारी यांनी गाववस्ती विभागून उपलब्ध शासकीय यंत्रणेतून गरजूंना प्रत्यक्ष अर्ज भरुन घेवून या योजनेकरिता लाभार्थी म्हणून त्यांची नोंद करुन घेवून त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत व पक्के घरे बनविण्यासाठी लवकरात लवकर घरकुल निधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सुरेश मल्हारी पाईकराव यांनी
निवेदनाद्वारे केली होती.
.
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवगातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त
वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. 2 ते 4 मधील
तरतुदींनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय
समिती , चंद्रपुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11.12.2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय
समितीने दिनांक 19.12.2023 रोजीच्या अदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या चंद्रपुर जिल्हयातील
1024 वैयक्क्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.6 येथील पत्रान्वये शासनास प्राप्त झाला अहे.
2. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सन 2024-25
करीता चंद्रपुर जिल्हयातील सोबत जोडलेल्या परिशिष्ट -अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे 1024 वैयक्क्तिक घरकुल
लाभार्थ्यांना कार्यत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांचा करीता प्रती लाभाथी रु.1.30 लक्ष प्रमाणे
रु.13,31,20,000/- (अक्षरी रुपये तेरा कोटी एकतीस लक्ष वीस हजार फक्त) व 4 टक्के प्रशासकीय निधी
(प्रती घरकुल रु.5200/- प्रमाणे) रु.53,24,800/- (अक्षरी रुपये त्रेपन्न लक्ष चोवीस हजार अठशे फक्त) असा
एकूण रु.13,84,44,800/- (अक्षरी रुपये तेरा कोटी चौऱ्याऐंशी लक्ष चव्वेचाळीस हजार अठशे फक्त)
इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत अहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.2,76,00,000/- (अक्षरी रुपये दोन कोटी शहात्तर लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.
सुरेश मल्हारी पाईकराव यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले यावेळेस जगदीश मारबते राकेश पारशिवे बबन वाघमारे विजय कवाडे आदी उपस्थित होते.

