महावीर इंटरनॅशनल तर्फे कृत्रिम अवयव मुल्यांकन ९ ऑगस्टरोजी टिंबर भवनात होणार शिबिर

0
108

प्रशांत देशपांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क यवतमाळ- येत्या ९ ऑगस्टला यवतमाळात मोफत कृत्रिम अवयव मुल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे महावीर इंटरनॅशनल सेवा केंद्र ट्रस्ट नागपूर व महावीर इंटरनॅशनल यवतमाळकेंद्र यासोबत रायसोनी ग्रुपच्या माध्यमातून हे शिबीर पार पडणार आहे. कृत्रिम अवयवांच्या माध्यमातून विद्यमाने चळवळीला एक नवीन अध्याय जोडण्यात आला आहे मोफत कृत्रिम अवयवांचे मुल्यांकन या ठिकाणी होणार आहे. या सोबतच पुर्व नोंदणी शिबीर पार पडणार आहे. ९ ऑगस्टला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत स्थानिय टिंबर भवनात कार्यक्रम पार पडणार आहे. या शिबिरामध्ये तज्ञ चमू दिव्यांगांच्या गरजा आणि कृत्रिम अवयावांसाठी पात्रतेचे मुल्यांकन करणार आहे पत्र व्यक्तींच्या कृत्रिम अवयवाच्या वितरण प्रक्रियेसाठी पुर्व नोंदणी केली जाणार आहे. कृत्रिम अंग तंतोतंत बसविण्यासाठी योग्य मापाचे असल्याची खात्री करण्यासाठी मोजमाप होणार आहे. यासाठी नागरिकांना महत्वाची कागदपत्रे, आधर कार्डची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो नोंदणीसाठी संपर्क नंबर ठेवावा लागणार आहे. सर्व पत्र रुग्णांना कृत्रिम अवयव वितरण तारीख २२ ते २४ ऑगस्टला नागपुरमधील रवी नगरमधील अग्रसेन भवन येथे वितरण होणार आहे. यासाठी यवतमाळ ते नागपुरपर्यंत अर्धे भाडे देण्यात येणार आहे. यामुळे कृत्रिम अवयव लागल्यानंतर सहज सुलभतेने हालचाली करता येणार आहे. यातून दिव्यांगांना स्वतःचे काम स्वतःच करता येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here