
येत्या दोन दिवसात कामगारांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा नगर परिषद कार्यलयात आंदोलनाला बसू – जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भद्रावती – दिनांक 06/06/2024 रोजी राष्ट्रीय कामगार सेना द्वारे नगर परिषद भद्रावती येथील कंत्राट कामगारांना घेऊन कायद्या नुसार किमान वेतन साठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातील शिष्ठ मंडळ यांनी भेट दिली व आंदोलनाला पाठिंबा देण्यात आले. कायद्या नुसार किमान वेतन कंत्राटी कामगारांना आज पर्यंत मिळालेला नाही व सहा गे सात हजार रुपये महिना मधे आज चा महागाई च्या काळात घर चालवणे कठीण झालेले आहे. तरी सुद्धा आपल्या जीवाची काळजी न घेता कोरोना मधे याच कंत्राटी कामगारांनी भद्रावती शहराची स्वच्छता राखून ठेवली. परंतु नगर परिषद मधल्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांच शोषण केले आहे. कामगारांना किमान वेतन कायदा लागू होऊन सुद्धा ठेकेदार द्वारे फक्त सहा ते सात हजार रुपये महिना दिल्या जातात ज्यामुळे कामगारांना अडचणीचे दिवस काळावे लागतात. ज्या पद्धतीने दिल्ली मधे केजरीवाल सरकार किमान वेतन कायद्या नुसार कंत्राटी कामगारांना स्थायी करून 25 हजार रुपये महिना दिल्या जाते त्याच प्रमाणे इथल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजेत व आम आदमी पार्टी सदैव कामगारांना न्याय देण्या करिता कटिबद्ध असून येत्या दोन दिवसात कामगारांच्या मागण्या मान्य करन्यात आल्या नाही तर कामगारांना घेऊन नगर परिषद चे काम बंद पाडू असा इशारा आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांनी दिला आहे. यावेळी कामगारांना पाठिंबा देण्या करिता आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुरेकर व भिवराज सोनी, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर, युवा जिल्हा उपाध्यक्ष मनीष राऊत, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गाज्जेवार, ओम पारखी, राजकुमार चट्टे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.











