प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा ( ठाणेगाव) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे दिनांक ०५ ते ०६ ऑगस्ट २०२४ ला सर्च शोधग्राम चातगाव जिल्हा गडचिरोली आयोजित या दोन दिवसीय तारुण्यभान कार्यशाळेत विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये विशेषत : कुमारावस्थेत मुलामुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल.आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाययोजना.अल्प वयात विवाह करणे हे केव्हाही घातक असते कारण या वयात शारीरिक आणि मानसिक विकास झालेला नसतो.माणसाला जडलेले व्यसन आणि त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम.तसेच कुमारी मातेचा गंभीर प्रश्न आणि समाजात त्यांना मिळणारी वागणूक.वयात येण्याच्या काळामध्ये होणारे धोके समजून घेऊन ते धोके आपल्याला कसे टाळता येतील याची सविस्तर माहिती तसेच मुलगी जितके वयात येणे त्यापेक्षा मुलगा वयात येणे यात मुलांच्या वयात येण्याच्या लैंगिक प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते.
या दोन दिवसीय कार्यशाळेत मुलांचे लैंगिक प्रश्न सोडविण्यात मदत झाली.मुलांचे आपल्या आई वडिलांबद्दलचे नाते कसे असावे? तसेच प्रेम आणि मैत्री या दोघात काय मर्यादा असाव्यात असे मोलाचे मार्गदर्शन डॉ.सुनंदा खोरगडे यांनी केले. तर गुप्तरोग आणि गुप्तरोग होण्याची विविध कारणे आणि समस्या या विषयावर राजेंद्र इसासरे यांनी विस्तृत माहिती सांगितली. विद्यार्थांना ही कार्यशाळा आयोजित केल्याने फारच मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल मेश्राम तसेच प्रमोद दिघोरे पर्यवेक्षक होते. वरील कार्यक्रमाचे संचालन हेमंत मोहितकर तर आभार प्रा.मनोज आलबनकार यांनी मानले.

