रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ओबीसी युवा अधिकार मंच आणि संघर्ष वाहिनी-भटके विमुक्त संघर्ष परिषदने आयोजित केलेली,ओबीसी,व्हीजे-एन टी,एसबीसी यांचे न्याय हक्कासाठी आणि जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे हा उद्देश समोर ठेऊन दिनांक- 3 ऑगस्ट 24 ला संविधान चौक नागपूर येथून निघालेली ‘मंडल-जनगणना यात्रा’ वणी- चंद्रपूर मार्गे दिनांक 5 ऑगस्टला ब्रम्हपुरी शहरात आल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
नंतर छत्रपती शिवाजी चौक पर्यंत रॅली काढण्यात आली.नंतर शासकीय विश्रामगृह हॉलमध्ये मार्गदर्शन सभा घेण्यात आली.
ओबीसी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते हरिश्चंद्र चोले सर यांचे अध्यक्षतेखाली झालेले सभेत उमेश कोराम,मोंटू पिलारे,सतीश मालेकर यांनी जातनिहाय जनगणना,ओबीसी आरक्षण,महाज्योतीला लागणारी निधी,ओबीसी शिष्यवृत्ती,72 वसतिगृह या विविध मुद्द्यावर मार्गदर्शन केले.
सभेचे अध्यक्ष हरिश्चंद्र चोले यांनी ब्रम्हपुरी येथील ओबीसी चळवळीचा इतिहास सांगून ओबीसींचे न्याय हक्क व ओबीसी जनगणना यासाठी ओबीसी चळवळीची आवश्यकता प्रतिपादित केली.
या सभेचे संचालन सुरज तलमले,प्रास्ताविक भाऊराव राऊत,आभार प्रदर्शन वैभव तलमले यांनी केले.याप्रसंगी असंख्य ओबीसी,व्हीजेएनटी, एसबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेश कोराम यांचे नेतृत्वात निघालेल्या या मंडल यात्रेचा समारोप दिनांक 7 ऑगस्टला (मंडल दिन) गोंदिया येथे होत असून,या प्रसंगी ओबीसींचे राष्ट्रीय नेते लक्ष्मण यादव मार्गदर्शन करणार आहेत.

