उषा पानसरे असदपूर
मुख्य कार्यकारी संपादीका
प्रबोधनी न्युज
9921400542
अकोला – दिनाक 7/8 आकोट घोरपडीची अवैधरित्या शिकार करून तिला मारून टाकून तिच्या मासाचे चार हिस्से करून वाटणी केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायलायाने नामंजूर केला आहे दिनाक 6/8 रोजी आकोट येथिल वि.जिल्हा व सञ न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी वनपरिक्षेञ अधिकारी आकोला प्रादेशिक वनविभाग आकोला परिमंडळ आकोट ता. आकोट जि. अकोला यांनी नोदंविलेला अप.क्र. 1280/ 31982/137224 वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972चे कलम 02 (16) अ.ब.क. 02 (36) 9,39,44,48,48 (अ) 51 व भारतीय वन अधिनियम 19 27चे कलम 52 मधिल फरार आरोपी राजू गूलाबराव काकड “वय वर्ष 51′ सेवकराम शालीकराम धांडे वय वर्ष 55 पिंटू उर्फ केशव गणेश शिगाडे वय वर्ष 44 हे सर्व आरोपी फरार राहणारी वडाळी देशमूख आकोट जि. आकोला यांनी वडाळी देशमूख येथे घोरपडीची अवैधरित्या शिकार करून मासाचे चार भागात हिस्से वाटणी केल्याच्या प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे या प्रकरणात सरकार तर्फ सरकारी वकील अजित देशमूख यांनी अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायलयात लेखी उत्तर यूत्वीवाद सादर केला कि दिनाक 12 /7/2024 रोजी वन्य प्राणी घोरपडची शिकार झाल्याची गोपनिय माहीती दि.तेरा सात ला मिळाल्या वरून दूपारी दो वाजता च्या दरम्यान रेंज फाॅरेस्ट आॅफीसर विश्रास थोरात आकोट व त्याचे वन कर्मचारी यांनी मौजे वडाळी देशमूख ता. आकोट जि. आकोला येथे जावून चौकशी केली..

