उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादीका प्रबोधिनी न्युज 9921400542 – अचलपूर – आज दिनाक 13 /8 अचलपूर: आजच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्याचे मनोबल वाढवण्याकरिता व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांकरिता सामोरे जाण्याकरिता आर्थिक व शैक्षणिक मदत होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या पदावर जायची इच्छा असते.त्यामुळे अशा प्रकारची इच्छा पूर्ण व्हावी याकरिता श्री जगदंब विणकर शिक्षण संस्था अचलपूर द्वारा संचालित जगदंब महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन करणे, त्यांना आर्थिक सहाय्य करणे व सोबतच स्पर्धात्मक परीक्षेकरिता लागणाऱ्या पुस्तकांचे वाटप करणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम महाविद्यालयाच्या वतीने घेतले जातात. महाविद्यालयामध्ये नुकताच UPSC परीक्षेकरिता लागणारे पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.यामध्ये महाविद्यालयाची (एम.ए. भाग 1) ची दिव्यांग विद्यार्थिनी कु. विधी मोहोड हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश कोहळे यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेची पुस्तके देवून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या…..

