ब्रम्हपूरीच्या गणेशोत्सवात भाविकांना होणार “अयोध्येच्या राम मंदिराचे” दर्शन

0
355

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाची नियोजन बैठक संपन्न

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

पुढील महीन्यात गणपती बाप्पा चे आगमन होणार असून सर्वत्र धामधूम असणार आहे. अशातच संपूर्ण विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रम्हपूरी शहरातील गणेशोत्सव देखील तितकाच लोकप्रिय आहे. या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा लाभली असून गणेशोत्सवात मोठा सामाजिक सलोखा देखील बघायला मिळतो.

या परंपरेला कायम ठेवत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ब्रम्हपूरीचा महाराजा या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी देखील मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असुन यावर्षी या मंडळाच्या वतीने अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून भाविकांना अयोध्येच्या राम मंदिराचे साक्षात दर्शन होणार आहे. मागील वर्षी या मंडळाच्या वतीने केदारनाथ मंदिराचा देखावा उभारण्यात आला होता. सोबतच गणेशोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार असून रुपेरी पडद्यावरील कलाकारांची देखील यानिमित्ताने गणेशोत्सवात हजेरी लागणार आहे. हे मात्र विशेष.

याबाबत नियोजन बैठक महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, न.प.माजी सभापती बाला शुक्ला, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सीडीसीसी बॅक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, माजी नगरसेवक संजय ठाकरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, तालुका काँग्रेस सचिव सतीश डांगे, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, अॅड. आशिष गोंडाणे, अतुल राऊत, पथविक्रेता समीतीचे रविंद्र पवार, शुभम कावळे यांसह महाराजा गणेश उत्सव समीतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here