काँग्रेसकडून प्रमोद चिमुरकर यांना ब्रह्मपुरी विधानसभेची उमेदवारी देण्याची जोरदार मागणी

0
174

ब्रम्हपुरी विधानसभेसाठी प्रमोद चिमुरकर यांना उमेदवारी द्या

उमेदवारीसाठी प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी समर्थकांसह जिलाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे अर्ज सादर केला

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आली असून अनेक इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. ब्रम्हपुरी विधानसभेसाठीही अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात ओबीसी प्रवर्ग ५० टक्क्यांहून अधिक असल्याने ओबीसी समाजातून कुणबी उमेदवारांची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, चंद्रपूरचे *माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर हे ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावी, हि मागणी जोर धरताना दिसत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडे विशेषत: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. प्रमोद चिमुरकर यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन विधानसभेच्या तिकिटाची मागणी करत उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात प्रमोदभाऊ चिमुरकर यांचा मोठा जनसंपर्क असून ब्रह्मपुरी तालुक्यात तसेच सावली व सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. प्रमोदभाऊ चिमुरकर निवडणुकीत विजयी झाल्यास सर्वसामान्यांना न्याय देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आत्तापर्यंत बजावलेल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहेत. त्याचा प्रभाव आजही मतदारांना जाणवत आहे.
एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी मेहनतीच्या जोरावर एक एक कार्यकर्ता जोडून खडतर परिस्थितीतून आपली राजकीय कारकीर्द घडवलेली आहे. त्यांनी ३ वेळा ग्रामपंचायत जवराबोडीचे सरपंच पद, २ वेळा ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व १ वेळा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. प्रमोदभाऊ चिमूरकर यांची नाळ गावाच्या मातीशी जोडलेली असते. आपणही समाजाचे ऋणी आहोत, त्याच उदात्त भावनेने गावातील वंचित, दलित, दुर्बल, निराधारांना आधार देण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहेत. राजकारणाला सामाजिक कार्याची जोड देऊन त्यांनी गावांच्या विकासासाठी शासनस्तरावर ते नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते. गावातील वंचित, दलित, दुर्बल आणि निराधारांच्या मदतीसाठी त्यांनी नेहमीच केलेल्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातीलच नव्हे तर सावली, सिंदेवाही तालुक्यातील हि सर्वसामान्य जनतेशी ते जोडले गेले आहेत. ते अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीचे उपाध्यक्ष आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रात लोकसेवेसाठी सदैव तत्पर असतात.
त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांना सर्व सामान्य जनतेमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. जिल्हा परिषद क्षेत्राबाहेरही त्यांनी जनतेला आवश्यक असलेला पाठिंबा दिला आहे. ब्रम्हपुरीचे पुढील आमदार प्रमोदभाऊ चिमुरकरच अशी गावागावात चर्चा आहे. यातच ब्रम्हपुरी विधानसभेसाठी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी काँग्रेस जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे जिलाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची भेट घेत उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज सादर केला. या वेळी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या उमेदवारीच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याचा दबाव पक्षावर आहे. प्रमोदभाऊ चिमुरकर यांची उमेदवारी स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षासाठी मोठा फायदा होऊ शकते, कारण त्यांचा सामाजिक प्रभाव आणि त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे मतदारांमध्ये मोठा विश्वास आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास ते मोठ्या फरकाने निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल. आता काँग्रेस नेत्यांचे पुढचे पाऊल काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या समर्थकांच्या मागण्यांना कसे उत्तर दिले जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here