प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – आज 15 ऑगस्ट 2024 नेताजी सुभाष चंद्र बोस उत्सव समितीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक बाबूपेठ येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण चा कार्यक्रम सकाळी 8,30 वाजता सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भाऊराव येसेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य सुधाकर राव ताटपल्लीवर व कोरोना योद्धा सुनील गोविंद वारूलवार स्वर्गवासी झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,राष्ट्र गीताने व अल्पपोहराने सांगता झाली, कार्यक्रमास नेताजी मंडळाचे सर्व सदस्य गण,रणरागिणी पतसंस्था महिला सदस्य गण,वार्डातील ज्येष्ठ नागरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,प्रास्ताविक अनिल तुंगीडवार तर आभार प्रदर्शन विवेक पोतनूरवार यांनी केले,कार्यक्रमाच्या यशवितेसाठी चंद्रशेखर मैलारपवार, अरविंद काळे, राजू भोयर, आदित्य आंबटकर, रेखा मैलारपवार, लीना तुंगीडवार, शालिनी काळे, संगीता चिडे, सविता पगाडे यांनी अथक परिश्रम केले.

