prabodhini news logo
Home चंद्रपूर सकल हिंदू समाजाच्या वतीने निघालेल्या मोर्चाचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

सकल हिंदू समाजाच्या वतीने निघालेल्या मोर्चाचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

0
113

 

शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याचे वितरण

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर- बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज, शुक्रवारी चंद्रपूर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शहरातून निघालेल्या मोर्चाचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले.
सकाळी गांधी चौकातून सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. सदर मोर्चा शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात आमदार किशोर जोरगेवार सहभागी झाले होते. सदर मोर्चाचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौकात स्वागत मंच तयार करण्यात आला होता. मोर्चा स्वागतमंचाजवळ पोहोचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे स्वागत करत शीतपेयाचे वाटप केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here