

जाहला मनास माझ्या
आज अपार हर्ष
कारण आज झाले
प्रबोधिनी न्युजला चार वर्ष
प्रबोधिनी न्युजचे आहेत
सर्वेसर्वा प्रशांत रामटेके सर
येतात भरभरून लेख, कविता चॅनलला
राहत नाही कसलीच कसर
अभिनंदन वर्धापनदिनी चॅनलचे
गगनभरारी सतत घेवो
सर्वांना लिहिण्याची संधी मिळो
चॅनल सोबत नाते दृढ होवो
वाचावयास मिळतात विविध विषय
प्रबोधिनी न्यूजच्या चॅनलवर
होतो मनास आनंद अपार
मखमालीचा जणू स्पर्श मनपटलावर
देते मी आज शुभेच्छा
प्रबोधिनी न्युज चॅनलची व्हावी भरभराट
जसा चंद्र वाढतो कलाकलाने
व्हावी तशी प्रगती भन्नाट
सर्वांचे लाडके जाहले
प्रबोधिनी न्यूज चॅनल छान
इतक्या कमी वेळात
मिळवला सर्वत्र किर्तीमान
कवियत्री लैलेशा भुरे
नागपूर














