prabodhini news logo
Home चंद्रपूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडणे म्हणजेच राज्य सरकार चा घोटाळा समोर...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडणे म्हणजेच राज्य सरकार चा घोटाळा समोर येणे

0
154

आप चे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांची कठोर प्रतिक्रिया

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पडण्याची घटना अत्यंत खेदजनक आणि लाजिरवाणी आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अवघ्या आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा पडण्याची घटना म्हणजेच येथे राज्य सरकारचा घोटाळा अख्या महाराष्ट्राला दिसून आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे आणि राज्याचे आदर्श असून, त्यांच्या पुतळ्याचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी घेतली आहे.

सुमित हस्तक यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. हा अपमान राज्य सरकारच्या प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा घटनांमुळे आमच्या राज्याच्या सांस्कृतिक वारशावर घाला येतो आहे, आणि या गोष्टीची आम्ही तिव्र शब्दांत निंदा करतो.”

आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले की या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्या जागी महाराजांचा पुतळा पुन्हा नव्या रीतीने बसवण्यात यावा. “जर राज्य सरकारने यावर तत्परतेने कारवाई केली नाही, तर आम्ही जनतेच्या सहकार्याने मोठ्या आंदोलनाचे आयोजन करू,” असेही सुमित हस्तक यांनी चेतावणी दिली.

सुमित हस्तक यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिवभक्त आणि सामाजिक संघटनांना एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here